खालच्या अंगाशी संबंधित एखादी समस्या उद्भवली की आपण बहुतेकजण ते लपविण्याचा येनकेनप्रकारेण प्रयत्न करतो, कदाचित सरत्या काळाबरोबर किंवा दुर्लक्ष करून ती बरी होईल या आशेने. बहुतेकदा योग्य तो उपचार न करता; पुढची पायरी म्हणजे काही इंटरनेट हॅक करून पाहणे किंवा जवळच्या एखाद्या वैदूकडे जाणे. परिणाम? एक सर्वसामान्य परिस्थिती एकदम जटिल करून टाकणे. यापेक्षा पहिल्या टप्प्यातच तज्ञांना भेटणे आणि योग्य प्रकारे त्याच्यावर उपचार करणे अधिक सोपे नाही का?

मूळव्याध/पाईल्स म्हणजे गुद्दद्वाराच्या मुखाशी असलेल्या रक्तवाहिन्यांना सूज येणे, आणि बहुतांश वेळा तिथे गुठळ्या जाणवणे.

कारणे

• दीर्घकालीन बद्धकोष्ठता
• कठीण मल
• गर्भधारणा
• मलविसर्जनादरम्यान अतिताण
• तीव्र खोकला

प्रोक्टोस्कोपी नावाच्या एका सामान्य चाचणीद्वारे मूळव्याधाचे निदान सहज केले जाते आणि तीव्रतेवर आधारित ४ ग्रेडमध्ये याचे वर्गीकरण केले जाते, ग्रेड १ मध्ये रक्तस्त्राव होतो आणि हा सौम्य स्वरूपाचा असतो, तर ग्रेड ४ हा रक्तवाहिन्यांना सूज येणे आणि गुद्दद्वाराच्या मुखातून बाहेर येणा-या ऊतींशी संबंधित असतो.

प्रोक्टोलॉजी ही औषधोपचाराची एक पद्धती आहे जी मूळव्याध, फिशर, फिस्टुला, बद्धकोष्ठता, पायलोनिडल सायनस इ. परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळते.

हिलिंग हँड्स क्लिनिक, अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे स्पेशालिटी प्रोक्टोलॉजी क्लिनिक आहे, जे मूळव्याधीच्या श्रेणीशी संबंधित विशिष्ट उपचार देते. ग्रेड १ आणि ग्रेड २च्या काही प्रकरणांमध्ये एमसीडीपीएने उपचार केला जातो, जी हर्बल औषधे, फिजियोथेरपी आणि आयुर्वेदिक तेल उपचाराच्या संयोजनाने तयार केलेली एक उपचारपद्धती आहे. प्रगत ग्रेड २ आणि ग्रेड ३ वर लेसर (एलएचपी) सह उपचार केले जातात, जी पुनरावृत्तीची शक्यता मिटवून जलद आणि परिणामकारक रोगमुक्ती प्रदान करते. जर दीर्घकालीन अज्ञानामुळे रोग ग्रेड ४पर्यंत पोहोचला असेल, तर स्टॅप्लर हेमोराहोयडिक्टॉमी करण्याची आवश्यकता असते. स्टॅप्लर शस्त्रक्रियेने बाहेर आलेला भाग पूर्णपणे काढून टाकला जातो आणि पुनरावृत्तीची कोणतीही शक्यता राहत नाही. एखाद्या तज्ञाद्वारे केल्या गेलेल्या या प्रक्रियेमुळे गुद्दद्वाराच्या मुखाशी असलेल्या वर्तुळाकार स्नायूंना कसलीच हानी पोहोचत नाही, अशा प्रकारे मोशनवर नियंत्रण ठेवणे शाबूत राहते.

हिलिंग हँड्स क्लिनिक, हे जगप्रसिद्ध कॉलोरेक्टल सर्जन डॉ. अँटोनियो लोंगो, इटली यांच्याद्वारे प्रोक्टोलॉजीमध्ये सेंटर ऑफ एक्सेलन्स म्हणून प्रमाणित केले गेलेले क्लिनिक आहे.

Author's Bio: 

Proctologist at Healing Hands Clinic