आपल्यापैकी बहुतेक लोकांना गुदद्वाराच्या भागाशी संबंधित कोणतीही समस्या असली तरी ती एकतर मूळव्याध असणार किंवा मग फिशर असे वाटते. आपल्या शब्दसंग्रहामध्ये या दोहोंपैकी कोणता शब्द रुजलेला आहे, त्यावर स्वतः केलेले हे निदान ठरते. निष्काळजीपणे केले जाणारे हे निदान फक्त वेदनाच वाढवत नाही, तर सोपी समस्यादेखील गुंतागुंतीची करून ठेवते.

मूळव्याध आणि फिशर यांच्यात काय फरक आहे?

मूळव्याध किंवा हमोऱ्हॉईड्स या गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या सुजलेल्या रक्तवाहिन्या असतात तर फिशरमध्ये गुदद्वाराच्या तोंडाशी असलेली नाजूक त्वचा फाटलेली असते. आजाराच्या तीव्रतेवर मूळव्याधीचे 1 ते 4 यानुसार वर्गीकरण केले जाते. पहिल्या श्रेणीमध्ये रक्तवाहिन्या फक्त सुजलेल्या असतात तर चौथ्या श्रेणीमध्ये गुदद्वाराच्या तोंडातून एक गोळा बाहेर आलेला असतो.

या दोहोंच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे?

शौच करताना तीव्र वेदना होणे, हे फिशरचे प्रमुख लक्षण आहे. या वेदनेची तीव्रता इतकी असते की रुग्णाला शौचास जाण्याची भीती वाटू लागते.

विष्ठा विसर्जित केल्यानंतर होणारा वेदनारहित रक्तस्राव, हे सामान्यतः मूळव्याधीचे लक्षण असते. काही वेळा एखाद्या रुग्णास गुदद्वाराच्या तोंडाशी एखादा गोळा बाहेर आल्यासारखे वाटू शकते.

मला एकाच वेळेस मूळव्याध आणि फिशरचा त्रास होऊ शकतो का?

हमोऱ्हॉईड्सच्या खूप जुन्या प्रकरणांमध्ये फिशरचा त्रास उद्भवतो. सामान्यतः, दीर्घकालीन बद्धकोष्ठता मूळव्याधीस कारणीभूत ठरू शकते. अशा प्रकरणांमध्ये, एखाद्यास फिशरबरोबर मूळव्याधही होणे अगदी सहजशक्य आहे. खरंतर, बद्धकोष्ठतेमधील सगळ्यात जास्त सर्वसामान्य गुंतागुंत म्हणजे फिशर होय. कारण कठीण झालेली विष्ठा जोराने बाहेर ढकलल्यामुळे गुदद्वाराजवळील नाजूक त्वचेस भेग पडू शकते.

निदानासाठी कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे?

लक्षणांचे वर्णन आणि प्रत्यक्ष तपासणी या गोष्टी फिशरचे निदान करण्यासाठी पुरेशा आहेत. हमोऱ्हॉईड्स असेल तर जास्त अचूक निदान आणि वर्गीकरण करण्यासाठी त्यासोबत प्रोक्टोस्कोपी नावाची साधी वेदनारहित प्रक्रिया करण्यात येते.

फिशर आणि मूळव्याध कायमची बरी होते का?

आधुनिक औषधोपचार गुदद्वार आणि गुदाशय यांच्याशी संबंधित समस्यांवरील विश्वासार्ह, जलद आणि प्रभावी उपायांची हमी देतात. प्रारंभिक अवस्थेतील मूळव्याध आणि तीव्र फिशर बरा करण्यासाठी औषधे, आहारातील जीवनशैलीतील बदल पुरेसे आहेत. फिशरच्या जुनाट प्रकरणांमध्ये लेझर हमोऱ्हॉयडोप्लास्टी (एलएचपी) किंवा स्टेप्लर शस्त्रक्रिया (एमआयपीएच) या सुरक्षित, कमीत कमी वेदनादायी आणि प्रभावी उपचाराच्या पद्धतींचा वापर करण्यात येतो.

Author's Bio: 

Proctologist at Healing Hands Clinic